अजीत पवार ; जानेवारीच्या हप्त्याची तारीख निश्चित या तारखेला 1500₹

अजीत पवार ; जानेवारीच्या हप्त्याची तारीख निश्चित या तारखेला 1500₹

अजीत पवार ; महाराष्ट्र सरकारने (जुलै 2024) मध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेत अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना दर महिन्याला 1500 रूपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे सहा हप्ते महिलांना मिळाले आहेत. सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाच निकष (अटी, शर्ती) लावल्या आहेत. (Ladki bahin news 2025)

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा यापूर्वी चा हफ्ता 25/डिसेंबरला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता जानेवारीचा हप्ता 26/जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये लाभार्थी महिलांना लाभ मिळण्यास सुरु होईल आणि 26/जानेवारी पर्यंत सर्व महिलांच्या खात्यात जानेवारी चा हप्ता जमा होईल. लाडकी बहिण योजना अशीच सुरू राहणार असून दर महिन्याला लाभार्थी महिलांना हप्ते मिळत राहतील असे मंत्री आदिती तटकरे यांनी तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

लाडकी बहिण योजनेत 2100 रुपये कधीपासून मिळणार यावर देखील मंत्री आदिती तटकरे प्रतिक्रिया दिली आहे. आधीसुद्धा याबाबत बऱ्याच वेळा स्पष्टीकरण दिले आहे. येत्या अर्थसंकल्पात व त्यापुढील काळात योजनेची रक्कम वाढवण्याचा विचार केला जाईल. या महिन्यात 1500 रुपयांचा लाभ दिला जाईल त्यासाठी 3 हजार 690 कोटींची तरतूद करण्यात आली आहे असेही तटकरे यांनी म्हटले आहे.

 

जुलै 2024 पासून लाडकी बहिण योजना सुरू आहे निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांप्रमाणे लाडक्या बहिणींना दर महिन्याला 2100 रुपये दिले जाणार आहे. येत्या अर्थसंकल्पात याबाबत तरतूद करून योजनेत रक्कम वाढवण्याबाबत महत्त्वाचे बदल केले जातील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन झाल्यावर दिलेली आहे.

 

Leave a Comment