कृषी अवजारे ; या तारखेपर्यंत कृषी अवजारांसाठी करा अर्ज – कृषी विभाग

कृषी अवजारे ; या तारखेपर्यंत कृषी अवजारांसाठी करा अर्ज – कृषी विभाग

कृषी अवजारे ; महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी अवजारे दिले जातात. कृषी अवतारामध्ये ट्रॅक्टर पासून ते ट्रॅक्टर चलीत उपकरणे, बैल चलीत अवजारे, टोकण यंत्रे, फवारणी पंप, पेरणी यंत्र, पाईप लाईन, ठिबक संच, तुषार संच तसेच ईतर कृषी अवजारे दिले अनुदानावर जातात.

कृषी अवजारांसाठी कृषी विभागाने 28/जानेवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. अन्न व पोषण सुरक्षितता योजनेत कडधान्य भात व गहू तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळितधान्य 2024-25 अंतर्गत महाडीबीटी संकेतस्थळावर सिंचन साधने, या घटकांचे लक्षांक भरण्यात आले आहे. तसेच कडधान्य मध्ये बीज प्रक्रिया ड्रम, पौष्टिक तृणधान्य अंतर्गत पल्वरायझर व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळितधान्य अंतर्गत मनुष्यचलित टोकण यंत्र मनुष्यचलित सिड ड्रिल, छोटे तेलघाणा यंत्र या घटकांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

अनुदानावर कृषी अवजारांसाठी 28/जानेवारी पर्यंत अर्ज करता येणार आहे. लाभार्थी निवड लॉटरी पद्धतीने होणार असून इच्छुक शेतकऱ्यांनी लवकर महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करावे. (कृषी विभाग)

 

Leave a Comment