पालकमंत्री ; पालकमंत्र्यांचे कार्य आणि अधिकार काय जाणून घ्या..
पालकमंत्री ; फडणवीस सरकारने संपूर्ण जिल्ह्यासाठी नुकतेच पालकमंत्री नेमले आहेत. फडणवीस सरकारने पालकमंत्री नेमताना मोठे फेरबदल केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे आणि मुंबई शहर या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. या लेखात पालकमंत्र्यांचे कार्य आणि अधिकार काय आहे जाणून घेऊया.
पालकमंत्र्यांचे अधिकार आणि कामे काय असतात…
मुख्यमंत्री जसे राज्याचे प्रमुख असतात तसेच पालकमंत्री जिल्ह्याचे प्रमुख असतात. पालकमंत्री जिल्ह्यातील प्रशासकीय आणि राजकीय नियंत्रण ठेवतात. राज्य सरकार, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून पालकमंत्री काम करतात. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी लागणारा निधी वितरित करण्याचा सर्वात महत्त्वाचा अधिकार पालकमंत्र्याकडे असतो. आमदार, खासदार यांनी मागणी केलेल्या कामांना मंजुरीचे अधिकारही पालकमंत्र्यांकडे असतात.
जिल्हा विकासासाठी महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. त्यामुळे महापालिका जिल्हा परिषद यासारख्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून होणारा विकास आणि इतर महत्त्वाच्या गोष्टीवर पालकमंत्र्याचे नियंत्रण असते. जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा करणे आणि त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून घेणे. आमदार खासदार यांनी मागणी केलेल्या कामांना मंजुरीचे अधिकार सुद्धा पालकमंत्र्यांकडेच असतात.