लाडकी बहिण योजना बंद होणार का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले..

लाडकी बहिण योजना बंद होणार का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले..

लाडकी बहिण योजना ; राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रूपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे 9000 रूपये महिलांना मिळाले आहेत. विरोधी पक्षांकडून लाडकी बहिण योजना निवडून झाल्यावर बंद होणार अशी टिका केली जात होती. या टिकेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की महिलांसाठी राबवली जाणारी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. तसेच इतर योजनांची अंमलबजावणी सुरू राहील आणि जाहीरनाम्यात दिलेल्या सर्व आश्वासन पुर्ण करण्यासाठी माझ्या सरकारचा प्रयत्न असेल. (Ladki bahin yojna 2025)

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की लाडकी बहिण योजना बंद होणार असल्याच्या अफवा आहेत. महिला आणि दलित लोकांसाठी राबवण्यात आलेली प्रत्येक योजना सुरु राहिल. लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या अफवा खोट्या असल्याचे आता सांगितले आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे सांगितले होते.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता अर्जांची पडताळणी सुरु आहे. या योजनेत अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहे. या योजनेत ज्या महिलांच्या कुटुंबाचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच सरकारी नोकरी आणि आयकर रिटर्न भरणाऱ्या कुटुंबातील महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. (Ladki bahin yojna)

Leave a Comment