शेतकरी कर्जमाफी ; शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का कृषीमंत्री कोकाटे…
शेतकरी कर्जमाफी ; विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन तात्कालिक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी अनेकदा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार याबाबत ग्वाही दिली होती. आता महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे आणि सरकारला केलेल्या आश्वासनांचा विसर पडलेला दिसतोय.
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का याबाबत कृषीमंत्री कोकाटे काय म्हणतात पहा..
राज्याचे नवीन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणतात अनेक शेतकरी वेळेवर कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित राहावे लागत आहे. वेळेवर कर्ज भरणारे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा काहीही फरक नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकित आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे. एकंदरीत शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफी बद्दल वेगवेगळी मते आहेत. आता वरिष्ठ पातळीवर म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री जे निर्णय घेतील त्या निर्णयाशी मि बांधिल असेल. (कृषीमंत्री माणिकराव कोकाटे महाराष्ट्र राज्य)
कर्जमाफी बाबतीत उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले पहा..
दौंड येथे सुरू असलेल्या जाहीर सभेत एका कार्यकर्त्यानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळेल असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की मी जेवढी भाषणे केली तेवढ्या माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी बाबत ऐकले का? आंथरूण बघून हातपाय पसरायचे असतात, राज्याचा गाडा आपल्याकडे आहे, आपण दोघं नंतर बसू , तुला मी माझी परिस्थिती सांगतो , मग तू मला तुझा सल्ला दे, मग त्याच्यातून काही जमत असेल तर आपण करू. आपण करायला कमी पडणार नाही असे अजित पवार यांनी सांगितले आहे. (शेतकरी कर्जमाफी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांनीदेखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल वक्तव्य केलं आहे. हसन मुश्रीफ हसत हसत म्हणतात की विधानसभेच्या निवडणुका आता संपलेल्या आहे. आता पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करणार आहोत. कर्जमाफी येत्या पाच वर्षात करायची आहे असे विधान हसन मुश्रीफ यांनी केले.
अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्यावरून शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार कि नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा मस्करी केली जातेय आणि शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि हसन मुश्रीफ यांच्या भाषनाचा YouTube video लाईव्ह पहा.