New district Maharashtra ; महाराष्ट्रात नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार का?

New district Maharashtra ; महाराष्ट्रात नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार का?

New district maharashtra ; 01/मे/1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली असून तेव्हा राज्यात 26 जिल्ह्ये होते. नंतर काही दिवसानंतर 10 नवीन जिल्ह्याची भर पडली. महाराष्ट्रात सध्या एकूण 36 जिल्हे अस्तित्वात असून 2014 ला पालघर या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती. महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांची विभागणी कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशा 06 विभागात केलेली आहे.

 

सध्या सोशल मीडियावर राज्यात नवीन 21 जिल्ह्याची निर्मिती होणार अशी बातमी फिरत आहे. परंतु या बातमीला कोणताही शासकीय पुरावा नाही. कोणत्याही राज्य मंत्र्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितलेले नाही तरी या बातमी मागे काय सत्य परिस्थिती आहे पाहुया.

 

राज्यात नवीन 21 जिल्ह्याची निर्मिती होणार हि सोशल मीडियावर फिरत असलेल्या बातमी मध्ये काहीही तथ्य नसून शासन स्तरावरून अशी कोणतीही घोषणा अथवा निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात काही नवीन जिल्हे करण्याची मागणी अधून-मधून होत असते. परंतु तसा निर्णय किंवा घोषणा शासकीय स्तरावर झालेला नाही.

 

नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार अशा बातम्या फिरताना कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून नवीन कोणता जिल्हा निर्माण होणार याची यादी खालीलप्रमाणे. तसेच नवीन जिल्ह्याची निर्मिती झाल्यावर कोणकोणत्या शासकीय यंत्रणा निर्माण कराव्या लागतात ते पहा.

 

Leave a Comment