पिएम किसान योजना ; घरात एकाच सदस्याला लाभ मिळणार (नवीन नियम)
पिएम किसान योजना ; शेतकऱ्यांना पिएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला 6000 रुपयांचा लाभ दिला जातो. कुटुंबातील अनेकांच्या नावे शेती असल्याने त्या सदस्यांना योजनेचा लाभ मिळतो. या योजनेचा पती, पत्नी, मुलगा, मुलगी योजनेचा लाभ घेतात. केंद्र शासनाने आता पिएम किसान योजनेसाठी नवीन नियमावली लागू केली आहे. या नियमानुसार कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असल्यास या पुढे कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. (Pm kisan yojna 2025)
शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने पिएम किसान योजनेचा लाभ दिला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2018 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. पिएम किसान योजनेचे आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. योजनेत सुरूवातीला नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. परंतु या योजनेत बोगस लाभार्थी योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनात आल्यानंतर ई-केवायसी व आधार लिंकिंग बंधनकारक करण्यात आलेली आहे. (Pm kisan yojna 2025)
नवीन अर्ज करण्यासाठी नवे नियम
पिएम किसान योजनेसाठी नवीन अर्ज करण्यासाठी पत्नी, मुलांचे कार्ड जोडावे लागणार आहे. तसेच वारसा हक्क वगळता 2019 पूर्वी ज्यांनी जमीन खरेदी केली त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.
पिएम किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी येणार…
पिएम किसान योजनेचा 19 वा हप्ता पुढच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी मध्ये वितरीत केला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि बॅंकेला आधार लिंक आहे अशा शेतकऱ्यांना योजनेचा पुढील हप्ता मिळणार आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी 01/ फेब्रुवारी 2019 पूर्वी जमीन नावावर असने आवश्यक आहे.
पिएम किसानचे तुमच्या कुटुंबात किती लाभार्थी…
पिएम किसान योजनेत कुटुंबातील अनेक व्यक्तींना लाभ मिळाला आहे.पण आता योजनेसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार एका कुटुंबातील फक्त एका व्यक्तीलाच योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि ई-केवायसी नसलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा योजनेचा लाभ मिळणार नाही तरी शेतकऱ्यांनी लवकर ई-केवायसी पुर्ण करा.