Gharkul scheme 2025 ; घरकुल योजनेसाठी कागदपत्रे, अनुदान आणि पात्रता काय असते..

Gharkul scheme 2025 ; घरकुल योजनेसाठी कागदपत्रे, अनुदान आणि पात्रता काय असते..

Gharkul scheme 2025 ; केंद्र आणि राज्य सरकार कडून घरकुल योजना राबवली जाते. गोरगरीब लोकांना स्वतःचे पक्के घर असावे यासाठी वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करून घरासाठी आर्थिक मदत केली जाते. 2025 मध्ये घरकुलाचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात अनुदान किती मिळते आणि लाभार्थी पात्रता काय आहे याबद्दल माहिती पाहुया.

 

घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी हि कागदपत्रे आवश्यक…

आधार कार्ड, राशन कार्ड, ग्रामपंचायत रहिवासी प्रमाणपत्र, जॉब कार्ड, बॅंक पासबुक, उत्पन्न प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो इत्यादी कागदपत्रे बंधनकारक आहे. याव्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही कागदपत्रांची मागणी होऊ शकते.

 

घरकुल योजनेत 2025 मध्ये किती अनुदान मिळते…

घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी चालू वर्षात (2025) मध्ये एक लाख 20 हजार रुपये एवढे अनुदान दिले जाते. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे हे अनुदान वाढवण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे परंतु अद्याप त्याबद्दल काही निर्णय झाला नाही. सध्या घरकुल लाभार्थ्यांना 1,20,000 एवढे अनुदान दिले जाते.

 

नवीन घरकुलांच्या याद्या अपडेट करण्यात आल्या आहेत. घरबसल्या आपल्या मोबाईल वर ऑनलाईन घरकुलांच्या याद्या पाहु शकतो. घरकुल योजनेची यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम खालील वेबसाइटला भेट द्या.
https://rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx

त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत निवडा. ज्या वर्षाची घरकुल योजनेची यादी पहायची ते वर्षे निवडा. त्यानंतर तुम्ही ज्या योजनेमध्ये घरकुल योजनेसाठी अर्ज केला त्या ती योजना निवडा, पुढे एक कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा टाका आणि सबमिट वर क्लिक करा. अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या घरकुल योजनेची यादी मोबाईल वर पाहु शकता. 

 

Leave a Comment