Budget 2025 पिएम किसान योजनेत हप्त्याची रक्कम वाढली का…

Budget 2025 पिएम किसान योजनेत हप्त्याची रक्कम वाढली का…

Budget 2024 केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या पिएम किसान योजनेला पाच वर्षापेक्षा जास्त दिवस पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर या योजनेत बदल होऊन योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढेल अशी अपेक्षा देशातील शेतकऱ्यांना होती. तसेच पिएम किसान योजनेच्या हप्त्यात वाढ होणार अशी माहिती केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याकडुन दिल्या जात होत्या. अर्थसंकल्पात पिएम किसान योजनेची रक्कम दुप्पट केली जाईल असे सुद्धा सांगितले जात होते. पिएम किसान योजनेत काही बदल झाले का पाहूया…

 

दि. 01/फेब्रुवारी/2025 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी 2025 चा अर्थसंकल्प सादर केला आहे.मात्र या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. पिएम किसान योजनेची रक्कमेत कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे देशातील सर्व शेतकऱ्यांची केंद्रीय मंत्र्याकडुन एक फसवणूक झालेली आहे. या योजनेत पुर्वीप्रमाणे दरवर्षी 6000 रूपये मिळत राहतील.

 

पिएम किसान योजनेत पाच वर्षे पूर्ण होत असल्याने योजनेच्या निधीमध्ये वाढ होणे अपेक्षित होते मात्र या योजनेत कसलाही बदल झालेला नाही. पूर्वीप्रमाणे या योजनेत वार्षिक सहा हजार रुपये मिळतील. तसेच पुढील 19 वा हप्ता हा 2000 रुपयांचा असेल. 19 व्या हप्त्याची तारीख निश्चित झाली असून शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा हप्ता वितरीत होईल.

Leave a Comment