Farmers scheme ; शेतकऱ्यांना लाडकी बहीण योजनेप्रमाणे पैसे मिळणार कृषीमंत्री माणिकराव कोकाटे

Farmers scheme ; शेतकऱ्यांना लाडकी बहीण योजनेप्रमाणे पैसे मिळणार कृषीमंत्री माणिकराव कोकाटे

Farmers scheme ; केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात थेट पैसे मिळतील यासाठी थेट लाभ हस्तांतरण (DBT) धोरण अधिक बळकट करणार, अशी ग्वाही कृषी विभागाचे नवे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. (Maharashtra news 2025)

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले राज्यात लाडकी बहीण योजनेसारखे थेट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कसे जातील यावर भर दिला जाईल. कृषी विभागाचा आढावा घेऊन आवश्यक तेथे बदल केले जातील. राज्यात पीकविमा योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे. त्याबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत, त्याबाबत चौकशी करण्यात येईल. (Agricultural news Maharashtra)

 

पीकविमा घोटाळ्याची चौकशी करून जे तथ्य येईल ते समोर आणले जाईल. सध्या तरी नाण्याची एक बाजू तुम्ही पाहली आहे. दुसरी बाजू पडताळली पाहिजे. ते पुढे म्हणाले, की कांदा दर आयात निर्णय यांसारख्या बऱ्याच गोष्टी केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत. त्यामुळे केंद्र सरकारशी समन्वय साधून काम करू. (माणिकराव कोकाटे)

 

Leave a Comment