Ladki bahin yojna ; लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार

Ladki bahin yojna ; लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार

Ladki bahin yojna ; महाराष्ट्र सरकारने (जुलै 2024) मध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेत अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना दर महिन्याला 1500 रूपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे सहा हप्ते महिलांना मिळाले आहेत. सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाच निकष (अटी, शर्ती) लावले आहेत. (Ladki bahin news 2025)

लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्याची आतुरता लागली आहे. मकर संक्रांतीच्या आधी लाडकी बहिण योजनेचा जानेवारी चा हप्ता जमा होईल असा अंदाज होता आणि तशी चर्चा सुद्धा सुरू होती. परंतु आता मकर संक्रांत उलटून गेली तरीही जानेवारी चा हप्ता जमा झालेला आला नाही. नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सूद्धा याबाबत निर्णय झाला नाही. त्यामुळे जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.

जुलै 2024 पासून लाडकी बहिण योजना सुरू आहे निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांप्रमाणे लाडक्या बहिणींना दर महिन्याला 2100 रुपये दिले जाणार आहे. येत्या अर्थसंकल्पात याबाबत तरतूद करून योजनेत रक्कम वाढवण्याबाबत महत्त्वाचे बदल केले जातील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन झाल्यावर दिलेली आहे.

लाडक्या बहिणींना जानेवारी चा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागले असुन लवकरच हप्ता वितरणास सुरूवात होईल.

Leave a Comment