Nuksaan bharpaai status अतिवृष्टी नुकसान भरपाईचे स्टेटस चेक करा..
Nuksaan bharpaai status ; अतिवृष्टी नुकसान भरपाईचे अनुदान हे आता DBT च्या माध्यमातून ईकेवायसी झाल्यावर शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बॅक खात्यात जमा केले जात आहे. महाराष्ट्र सरकारने नुकसान भरपाई च्या अनुदानाचे स्टेट्स पाहण्यासाठी एक वेबसाइट सुरू केली आहे. या वेबसाईटवर आपल्याला किती अनुदान मिळाले, कोणत्या बॅकेत आले तसेच आपली ईकेवायसी झाली आहे का याची संपूर्ण माहिती ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलवर पाहता येणार आहे.
या पोर्टलवर VK नंबर टाकून आपल्या नुकसान भरपाईचे स्टेटस पाहता येणार आहे. अनुदान किती आले, कोणत्या बॅंकेत आले, तसेच आपली ईकेवायसी पुर्ण झाली का, अनुदान खात्यात जमा झाले का, अनुदान खात्यात का जमा झाले नाही याबद्दल संपूर्ण माहिती https://mh.disastermanagement.mahait.org/PaymentStatus या पोर्टलवर पाहता येईल..
अतिवृष्टी नुकसान भरपाईचे स्टेटस कसे पहावे याबाबत खालील YouTube video लाईव्ह पहा.