Panjab dakh news ; पंजाब डख नवीन अंदाज, ढगाळ वातावरण, पाऊस येईल का…
Panjab dakh news ; सध्या राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून दिवसाचे तापमान आणि रात्रीची थंडी कमी झालीय. धुके धुराळी दिवसासुद्धा जाणवत आहे. अशातच प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी आज दि. 15/जानेवारी रोजी नवीन अंदाज वर्तवला आहे, पाहुया पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या नवीन अंदाजानुसार 15/, 16/, 17/जानेवारी दरम्यान संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होईल आणि दिवसभर थंडी कमी होईल तसेच रात्री थंडी सुद्धा जाणवणार नाही. परंतु राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही तरी सर्व शेतकऱ्यांनी हे लक्षात घ्यावे.
आजपासून पुढचे तीन दिवस म्हणजेच 17/जानेवारी पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहिल पर्यंत पावसाची शक्यता नाही असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. 19/जानेवारी पासून पुन्हा राज्यात थंडीचा कडाका वाढेल आणि वातावरण स्वच्छ होईल.
प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा YouTube video खाली पहा…