Pm kisan 19’th beneficiary list पिएम किसान योजना 19 वा याद्या अपडेट नवीन याद्या…

Pm kisan 19’th beneficiary list पिएम किसान योजना 19 वा याद्या अपडेट नवीन याद्या…

Pm kisan 19’th beneficiary list ; केंद्र सरकार कडून देशातील खातेदार शेतकऱ्यांना पिएम किसान योजनेद्वारे दरवर्षी 6000 रूपये दिले जातात. पिएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ईकेवायसी करणे बंधनकारक आहे. पिएम किसान योजनेचा 19 वा हप्ता फेब्रुवारी अखेरीस वितरीत करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. (Pm kisan 19’th instalment date)

पिएम किसान योजनेच्या अपडेट केलेल्या यादीमध्ये राज्यातील तीन लाखांपेक्षा अधिक शेतकरी ईकेवायसी पुर्ण नसल्याने पिएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्यापासुन वंचित राहणार आहे. सध्या केंद्र सरकारचे सुरू असलेली विशेष मोहीम सुरू आहे या मोहिमेत सामील होऊन तुम्ही तुमची ईकेवायसी पुर्ण करुन योजनेचा लाभ घेऊ शकता. ईकेवायसी पुर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमचे थकित हप्ते सुद्धा वितरित केले जाणार आहे.

पिएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याच्या नवीन अपडेट केलेल्या याद्या तुम्ही तुमच्या मोबाईल वर पाहु शकता. या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा 19 वा हप्ता वितरित होणार आहे. यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी खालील प्रोसेस स्टेप बाय स्टेप पुर्ण करा…

पिएम किसान योजनेची नवीन अपडेट झालेली यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम पिएम किसान योजनेची अधिकृत वेबसाइट उघडा.
(Pmkisan.gov.in)

त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका व त्यानंतर गावाचे नाव निवडून get report वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील ईकेवायसी पुर्ण असलेल्या 19 व्या हप्त्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी पाहता येईल…

Leave a Comment