Pm kisan news ; फक्त या एका चुकीमुळे योजनेचे हप्ते कायमचे बंद….

Pm kisan news ; फक्त या एका चुकीमुळे योजनेचे हप्ते कायमचे बंद….

Pm kisan news ; केंद्र सरकारने 2019 पासून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत खातेदार शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रूपये तीन टप्प्यात दिले जातात. चार महिन्याच्या फरकाने 2000 रूपये DBT द्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. फेब्रुवारी मध्ये बजेट सादर झाल्यानंतर पुढील हप्ता वितरित केला जाईल.

 

पिएम किसान योजनेतून बोगस लाभार्थी बाहेर काढण्यासाठी ईकेवायसी करणे अनिवार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ईकेवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांचे पुढील हप्ते बंद होणार आहे. पिएम किसान योजनेचे हप्ते सुरू ठेवण्यासाठी ईकेवायसी, बॅंक खात्याला आधार लिंक, आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव्ह असने आवश्यक आहे. (Pm kisan news)

ज्या शेतकऱ्यांना पिएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा नाही म्हणजेच आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या शेतकऱ्यांना योजनेतून बाहेर पडण्यासाठी पिएम किसान च्या पोर्टलवर Voluntary surrender of pm kisan benefits हा एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. जे शेतकरी पिएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक नाही असे शेतकरी येथे माहिती भरून योजनेतून बाहेर पडू शकतात.

जर तुम्ही चुकुन येथे माहिती भरली आणि योजनेतून बाहेर पडले तर तुम्हाला पिएम किसान योजनेचे हप्ते कायमचे बंद होतील आणि पुन्हा पिएम किसान योजनेसाठी नोंदणी सुद्धा करता येणार नाही. तरी शेतकऱ्यांनी सावध रहावे. अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहा. धन्यवाद..

 

Leave a Comment