Shetkari karjmafi ; अजित पवारांकडुन शेतकऱ्यांची मस्करी नेमके काय म्हणाले पवार…
Shetkari karjmafi ; विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू असे आश्वासन दिले होते. संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असे जाहीरनाम्यात स्पष्ट लिहिले होते. आता महायुतीचे सरकार आले असून शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी दिली जाईल असे प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारले जातात. कर्जमाफीचा विषय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी हसण्यावर नेत शेतकऱ्यांची मस्करी केलीय. नेमके अजित पवार आणि हसन मुश्रीफ काय म्हणाले पहा.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंड (पुणे) येथील जाहीर कार्यक्रमात मी माझ्या भाषणात कधीही कर्जमाफी बद्दल बोललो नाही असे म्हणत कर्जमाफी पासून हात वर केलेत. एका कार्यकर्त्याला बोलताना पवार म्हणाले की माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी बद्दल ऐकलंय का. त्यांच्या या वक्तत्व्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण आहे.
उपमुख्यमंत्रीअजित पवार नेमके काय म्हणाले पहा..
दौंड येथे सुरू असलेल्या जाहीर सभेत एका कार्यकर्त्यानी दादांना शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळेल असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की मी जेवढी भाषणे केली तेवढ्या माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी बाबतीत ऐकलंय का? तुला एक माहिती आहे का? आंथरूण बघून हातपाय पसरायचे असतात, राज्याचा गाडा आपल्याकडे आहे, आपण दोघं नंतर बसू , तुला मी माझी परिस्थिती सांगतो , मग तू मला तुझा सल्ला दे, मग त्याच्यातून काही जमत असेल तर आपण करू. आपण करायला कमी पडणार नाही असे अजित पवार यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांनीदेखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल वक्तव्य केलं आहे. हसन मुश्रीफ हसत हसत म्हणतात की विधानसभेच्या निवडणुका आता संपलेल्या आहेत. 03 गॅस सिलेंडर देण्याची योजना सुरू राहील. मुलींचे उच्च शिक्षण मोफत सुरु राहील. महिलांना एसटीच्या प्रवासात 50% सवलत आहे. शेतकऱ्यांचे वीजबील आम्ही माफ केले आहे. अशा अनेक योजना सुरू आहेत. तसेच आता पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मग कर्ज माफी करणार आहोत. कर्जमाफी येत्या पाच वर्षात करायची आहे असे विधान हसन मुश्रीफ यांनी केलंय.
अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्यावरून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार कि नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा मस्करी केली जातेय आणि शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलाय. अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्या भाषनाचा YouTube video पहा