Solar pump scheme ; शेतकऱ्यांनो सावधान पैसे भरूनही सोलार पंप मिळणार नाही…
Solar pump scheme ; शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य शासन अतिशय प्रभावीपणे सौर पंप योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 05% ते 10% लाभार्थी हिस्सा भरुन सोलार पंप दिले जातात उर्वरित रक्कम ही शासनाकडून भरली जाते. राज्य आणि केंद्र मिळून 90 ते 95% अनुदान सोलार पंपावर देत आहे.
महाराष्ट्रात सध्या मागेल त्याला सोलार पंप योजना राबवली जात असून पिएम कुसुम, महावितरण आणि मागेल त्याला सोलार पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना मागेल त्याला सोलार पंप योजनेत समाविष्ट करून पेमेंट करण्याचे ॲप्शन दिले आहे. परंतु मागेल त्याला सोलार पंप योजनेत पेमेंट केल्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी होणार आहे.
मागेल त्याला सोलार पंप योजनेत या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही….
मागेल त्याला सोलार पंप योजनेत ज्या शेतकऱ्यांनी पुर्वी सोलार पंप घेतला होता अशा शेतकऱ्यांना तसेच शेतकऱ्यांच्या नावावर विजेचे कोटेशन असल्यास आणि सामाईक विहीर, जमीन असेल आणि विहिरीवर विज कनेक्शन असेल तर अशा शेतकऱ्यांना सोलार पंप योजनेतून वगळण्यात येणार आहे.
मागेल त्याला सोलार पंप योजनेत पेमेंट केल्यानंतर सुद्धा तुमचा अर्ज काही कारणास्तव योजनेतून बाद झाला तर तुमचे भरलेले पैसे येण्यासाठी बरीच वाट पहावी लागु शकते. तरी शेतकऱ्यांनी पेमेंट करताना आपल्या 7/12 वर विहीर/बोअरवेल ची नोंद असने तसेच विज कनेक्शन नसने याआधी सोलार पंपाचा लाभ घेतलेला नसेल तरच मागेल त्याला सोलार पंप योजनेत पेमेंट प्रोसेस पुर्ण करा.
पेमेंट केल्यानंतर सोलार पंप योजनेतून जर अर्ज बाद झाला तर तुमचे पैसे येण्यासाठी किती वेळ लागू शकतो. तसेच तुमच्या पैशावर कोणतेही व्याज महावितरणकडून दिले जाणार नाही असे स्पष्ट महावितरणकडून दिले जाणार नाही.
मागेल त्याला सोलार पंप योजनेत पेमेंट करण्याआधी एकदा खालील YouTube video पहा…